•      
  • English
  •      
  • मराठी
    प्रशिक्षण प्रकार

    प्रशिक्षण प्रकार

    कार्यक्रम आणि उपक्रम ( Program and Activities)

    मित्रामार्फत आजतागायत नागरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रासाठी विविध विषयांवरिल राज्यस्तरिय, राष्ट्रीय स्तरावरील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यात प्रामुख्याने नेदरलँड येथील केंद्रासोबतचे पाणी पुरवठा योजनेचे शाश्वत व्यवस्थापन, युरोपियन युनियन मार्फत घेण्यात आलेले Ecosan विषयावरिल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, 'GIZ' मार्फत आयोजित शहर आणि वातावरण बदल या विषयाचे प्रशिक्षण इ. कार्यक्रमांचा समावेश होता. राज्यशासन, युनिसेफ तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, केंद्रशासन यांचे विविध प्रशिक्षण मित्रा येथे घेण्यात येते. त्याअंतर्गत मित्रामार्फत पाणी पुरवठा योजना तयार करणे, सांडपाणी व मलनिस्सारण योजना तयार करणे, त्यांची संकल्पने करणे, वॉटर ऑडिट व एनर्जी ऑडिट, घनकचरा व्यवस्थापन, ऑटोमेशन व स्काडा व्यवस्था, योजनांची देखभाल व दुरूस्ती करणे, माहितीचा अधिकार, लेखा व आस्थापनाविषयी प्रशिक्षणे, सॉफ्ट स्किल्स् इ.इ विषयांचे प्रशिक्षण घेण्यात येते.

    मित्राचे ध्येय/ उद्देश लक्षात घेऊन पाणी व स्वच्छता या क्षेत्रांबरोबरीनेच पर्यावरण क्षेत्रातील व्यापकता विचारात घेऊन मित्राने विविध संस्थांशी विविध विषयांसाठी सामंजस्य करार केले. त्याअंतर्गत GIZ, New Delhi ( जर्मन NGO ), NEERI नागपूर या संस्थांसोबत प्रशिक्षण निर्मिती, प्रशिक्षक तयारी, प्रशिक्षण साहित्य तयार करणे इ. बाबींसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याअनुषंगे सध्या पाणी व हवामान बदल (Water & Climati Change ) या विषयावरिल प्रशिक्षण GIZ, New Delhi व NEERI, नागपूर यांचे सहकार्याने मित्रामार्फत विकसीत करण्यात येत आहे.

    तसेच IIT पवई यांचेसोबतही प्रशिक्षण व संशोधनात्मक कामांसाठी करार करण्यात आला आहे. याद्वारे मित्रा येथे जलतंत्र संगणक प्रणाली प्रशिक्षण घेण्यात येत असुन ओझर साकोरा पाणी पुरवठा योजनेअंतर्गत Automation द्वारे पाणी पुरवठा व्यवस्थापन याबाबतचे काम IIT पवई च्या मार्गदर्शनाखाली व सिमेन्स कंपनीच्या CSR फंडातुन करण्यात येत आहे. यासाठी मजीप्रा. मित्रा, IIT पवई व सिमेन्स् कंपनी या चार संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

    मित्रा संस्थेत पाणी, स्वच्छता व पर्यावरण विषयांचे तांत्रीक प्रशिक्षणांसोबत शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागरी स्वराज संस्था (Urbon Local Bodies) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत ( Directorate of Municipal Administration) मित्रा येथे घेण्यात येतात. तसेच नगरपालिका / नगरपंचायत यांचेमध्ये कार्यरत असलेले अभियंता, तारतंत्री, पंपचालक, गाळणीचालक, प्लंबर, सॅनिटरी सुपरवाझर इ. संवर्गासाठी मित्रामार्फत प्रशिक्षण घेण्यात येते. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीतील पंपचालक, तारतंत्री, वीजतंत्री यांचेसाठी मित्रामार्फत तीन महीन्यांचे प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. या आधारावर ITI नाशिक सोबत सदर संवर्गाच्या प्रशिक्षण व परिक्षा याबाबत सामंजस्य करार करण्यात येत आहे. तसेच मित्रा संस्थेमार्फत अभियंता, भुजलतज्ञ, प्लंबर इ. साठी व्यावसायीक परिक्षा घेण्यात येतात. त्यादृष्टीने प्लंबर यांचेसाठी मित्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरिल प्रयोगशाळा तयार करण्याचे नियोजन आहे.

    मित्राच्या शाश्वततेसाठी मित्रा संस्थेमार्फत यशदा, पुणे संस्थेचे नवनियुक्त सरपंचाचे प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन विषयाचे अधिकाऱ्यांसाठीचे प्रशिक्षण आणि पुढील काळात सामान्य प्रशासन विभागामार्फत महसुल विभागातील विविध संवर्गाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे.